संग्रहित छायाचित्र
स्टील व इतर मेटल धातूच्या खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून बांधकाम व्यावसायिकाची तब्बल २६ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पर्पल कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात एप्रिल २०२३ ते १७ डिसेंबर २०२४ दरम्यान घडला.
करण दिलीप बोथरा (रा. पितळेनगर, सॅलिसबरी पार्क) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. गणेशखिंड रोड परिसरात राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची पर्पल कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. व्यवसायानिमित्ताने त्यांची करण बोथरा याच्याशी ओळख झाली होती. बोथराने खरेदी विक्रीच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळू शकतो, असे सांगितले. तसेच फिर्यादी यांना वेळोवळी गुंतवणूक करण्यास भाग पाडले. गुंतवणुकीची व त्यावरील होणार्या फायद्याची रक्कम चेकद्वारे डिक्लरेशन कम अंडर टेकिंग दस्त लिहून दिली.
तरीही त्यांना पैसे परत न करता फिर्यादी यांचा विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी साहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.