संग्रहित छायाचित्र
बारामती शहरात २३ वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची भयंकर घटना घडली आहे. या हत्येच्या प्रकरणात बारामती पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे बारामती शहर हादरून गेले आहे.
अनिकेत सदाशिव गजाकस असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अभिषेक सदाशिव गजाकस यांनी बारामती शहर पोलिसांत तक्रार दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बारामतीतील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद कॉलेज रस्त्यावर रात्री अकराच्या सुमारास २३ वर्षीय अनिकेत गजाकस याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने अनिकेत गजाकस याचा मृत्यू झाला. अनिकेत हा मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरून हा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात बारामती शहर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलिस करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.