Pune: कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार

पुणे: कोथरूड (Kothrud) परिसरात कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर (Sharad Mohol) गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. त्याच्यावर ३ ते ४ संशयितांनी तीन गोळ्या झाडल्या आणि त्यातील

Sharad Mohol

Pune: कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार

मोहोळवर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

पुणे: कोथरूड (Kothrud) परिसरात कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर (Sharad Mohol) गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. त्याच्यावर ३ ते ४ संशयितांनी तीन गोळ्या झाडल्या आणि त्यातील एक गोळी लागल्याची माहिती आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. शरद मोहोळवर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच हल्लेखोर निष्पन्न झाला असून त्याच्या शोधार्थ पोलीसांची पथके रवाना झाली आहे, अशी माहिती कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली आहे. (Pune Crime News)

अलीकडे वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांत दिसणाऱ्या शरद मोहोळ याच्यावर गोळीबार झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. मोहोळवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल असून काही गुन्हयांत त्याची निर्दोष मुक्तता देखील करण्यात आली आहे. 

पोलीस घटनास्थळी पोहचले असून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असल्याचे कळते आहे. सदर घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.  

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest