पुणे : नाकाबंदीदरम्यान पोलिसांना धक्काबुक्की

नाकाबंदीदरम्यान वाहनांची तपासणी केली जात असताना पोलिसांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मगरपट्टा येथील मुख्य प्रवेशद्वारासमोर गुरुवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास घडली.

पुणे : नाकाबंदीदरम्यान पोलिसांना धक्काबुक्की

पुणे : नाकाबंदीदरम्यान वाहनांची तपासणी केली जात असताना पोलिसांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मगरपट्टा येथील मुख्य प्रवेशद्वारासमोर गुरुवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

मधुकर सरदारसिंह ठेंग ऊर्फ पाटील (रा. कुबेरा विहार, संजीवनी रुग्णालयासमोर, हडपसर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई गोकुळ श्रीकांत भोसले यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहन तपासणीला सुरुवात केली आहे. हडपसर येथील मगरपट्टा येथे पोलिसांनी नाकाबंदी लावलेली होती. 

त्यावेळी आरोपी पाटील हा दुचाकीवरून येताना दिसला. विशेष म्हणजे तो रस्त्याच्या विरुद्ध बाजूने येत होता. त्याला पोलिसांनी थांबवले. त्याला वाहन परवाना दाखविण्यास सांगितले. तसेच, त्याची ‘ब्रेथ अनालायझर’ यंत्राद्वारे तपासणी करण्यास सुरुवात केली. या तपासणीला आरोपीने नकार दिला. तसेच, त्याने यावेळी पोलिसांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. तसेच, पोलीस पैसे मागतात असे म्हणत पोलिसांना धमकावले. आरोपीला फिर्यादी आणि अन्य पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून अंगावर धावून जात कॉलर पकडून धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story