पुणे : गुन्हेगाराकडून गुन्हे शाखेच्या पोलिसांवर गोळीबार; न घाबरता पोलिसांनी पाठलाग करून आवळल्या मुसक्या

एका गुन्ह्यात फरार असलेल्या गुन्हेगाराचा पाठलाग करीत मुळाशी तालुक्यातील मुठा गावात पोचलेल्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकावर या गुन्हेगाराने गोळीबार (Pune Firing) केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.

Pune Police Firing

पुणे : गुन्हेगाराकडून गुन्हे शाखेच्या पोलिसांवर गोळीबार; न घाबरता पोलिसांनी पाठलाग करून आवळल्या मुसक्या

पुणे : एका गुन्ह्यात फरार असलेल्या गुन्हेगाराचा पाठलाग करीत मुळाशी तालुक्यातील मुठा गावात पोचलेल्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकावर या गुन्हेगाराने गोळीबार (Pune Firing)  केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. (Pune Police Firing) पोलिसांवर त्याने एक गोळी झाडली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी देखील पाठोपाठ एक अशा सलग तीन गोळ्या झाडल्या. पोलिसांनी त्याच्या गोळीबाराला न जुमानता गाडी दुचाकीला आडवी घालत त्याच्या आणि साथीदाराच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या पोलीस पथकाला शाबासकी देत एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. (Pune Crime News) 

नवनाथ निलेश वाडकर (वय १८, रा. जनता वसाहत, पर्वती) आणि केतन साळुंखे अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. केतन साळुंखे हा स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. त्याने एका पत्रकार हल्ला करीत गोळी झाडली होती. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडकर सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. वाडकर हा साथीदारांसह सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावला होता. मात्र, त्याला पोलिसांची कुणकुण लागताच तो पोलिसांना गुंगारा देत पसार झाला होता. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाडकरसह त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान, वाडकर मुळशी तालुक्यातील मुठा परिसरात आलेला असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांचे पथक दोन मोटारींतून मुठा परिसरात गेले. त्याचा माग काढत असतानाच एनडीए रस्ता येथे तो दुचाकीवरुन साथीदारासह जात असलेला वाडकर पोलिसांच्या दृष्टीस पडला. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरु केला. दरम्याम, त्याने पोलिसांना पाहताच पिस्तूल बाहेर काढले. पोलिसांच्या दिशेने  पिस्तूलातून गोळी झाडली. मात्र, सुदैवाने ही गोळी कोणाला लागली नाही. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी देखील त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. यानंतर पोलिसांनी मोटार वेगाने पुढे नेत त्याच्या गाडीला आडवी घातली. वाडकर आणि त्याचा साथीदार केतन या दोघांना ताब्यात घेतले. 

पर्वतीजवळच्या जनता वसाहत आणि परिसरात या निलेश वाडकरची दहशत आहे. या ठिकाणी वाडकरसह चॉकलेट सुन्या नावाच्या गुन्हेगारी टोळीची देखील दहशत आहे. या दोन्ही टोळ्या या भागात सक्रिय आहेत. या दोन्ही टोळ्यांमध्ये पूर्ववैमनस्य असून वरचवासचे वाद आहेत. या दोन्ही टोळ्यांमध्ये अनेकदा यावरून खटके उडालेले असून एकमेकांवर हल्ले झालेले आहेत. पर्वती पायथा येथे चॉकलेट सुन्याच्या टोळीने २०१८ मध्ये वाडकर टोळीचा तत्कालीन म्होरक्या निलेश वाडकर खून केला होता. त्यामध्ये चॉकलेट सुन्यासह २२ जणांना अटक करण्यात आली होती. चॉकलेट सुन्या आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई देखील करण्यात आली आहे. निलेश वाडकरचा मुलगा नवनाथ हा त्यावेळी अल्पवयीन होता. वडिलांच्या खुनाचा बदला घेण्याची शपथ घेतलेल्या नवनाथने साथीदारांसह मिळून चॉकलेट सुन्याच्या भावाचा काही महिन्यांपूर्वी खून केला होता. अल्पवयातच त्याच्यावर दोन जणांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेले होते. अल्पवयीन असताना देखील त्याच्यावर एकूण आठ गुन्ह्यांची नोंद झाली होती. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest