संग्रहित छायाचित्र
पुणे:अज्ञात चोरट्याने बंद दुकानाचे शटर उचकवटून बेकायदेशीर प्रवेश करत काउंटरमधील ९० हजार रुपयांवर डल्ला मारला. हा प्रकार शहरातील कोथरूड मधील आझादनगर येथील ओम फ्रुटस अॅण्ड व्हेजीटेबल्स या दुकानात दिनांक २३ आणि २४ जानेवारी दरम्यानच्या रात्री ११ ते सकाळी ८.३० वाजता या काळात घडला. (Pune Crime)
याप्रकरणी भारत रामभाऊ कराळे (रा. शिवराज बिल्डिंग, वृंदावन कॉलनी,आझादनगर, कोथरूड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्यात दाखल केली. त्यावरून पोलीसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भारत कराळे यांचे कोथरूडमधील आझादनगर येथील ओम फ्रुटस अॅण्ड व्हेजीटेबल्सचे दुकान आहे. दरम्यान दुकान बंद करून कराळे आपल्या घरी गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने बंद दुकानाचे शटर तोडून दुकानात बेकायदेशीर प्रवेश केला आणि दुकानातील काउंटरमधील ९० हजार रुपये रोख चोरून नेली. हा प्रकार दिनांक २३ व २४ जानेवारी दरम्यानच्या रात्री ११ ते सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडला. दरम्यान कराळे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी कोथरूड पोलीसात धाव घेतली. पुढील तपास कोथरूड पोलीस करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.