Pune Crime News : तरुणीला एसिड टाकण्याची धमकी

एकतर्फी प्रेमामधून तरुणीच्या चेहऱ्यावर एसीड टाकण्याची धमकी दिली. तिला बळजबरीने मिठी मारून विनयभंग केला तसेच शिवीगाळ करीत मारहाण केली. ही घटना नऱ्हे येथील काळभैरव मंदिरजवळील झील कॉलेजजवळ घडली.

संग्रहित छायाचित्र

पुणे : एकतर्फी प्रेमामधून तरुणीच्या चेहऱ्यावर एसीड टाकण्याची धमकी दिली. तिला बळजबरीने मिठी मारून विनयभंग केला तसेच शिवीगाळ करीत मारहाण केली. ही घटना नऱ्हे येथील काळभैरव मंदिरजवळील झील कॉलेजजवळ घडली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैभव तुकाराम कर्णिक (वय २०) असे आरोपीचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी १८ वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. पिडीत मुलगी कात्रज परिसरात राहण्यास आहे. आरोपी हा या मुलीला ओळखतो. त्याने तिचा वारंवार पाठलाग केला. तिला कॉलेजजवळ असलेल्या निर्माणाधीन इमारतीच्या खाली नेले. तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. तिचा विनयभंग करीत अश्लील स्पर्श केले. तसेच, तिने विरोध केला असता शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. तोंडावर एसीड टाकण्याची धमकी दिली. तसेच, इनस्टाग्रामवर दोन बनावट आयडी तयार केले. त्यावर दोघांचे फोटो स्टोरी ठेवत बदनामी केली. पुढील तपास उपनिरीक्षक शिवाजी बुनगे करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest