Pune Crime News: दुचाकीवरून मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ

पुणे: रस्त्याकडेला थांबलेल्या नागरिकांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हडपसर परिसरात नागरिकांचे मोबाईल जबरदस्तीने चोरून

Pune Crime

संग्रहित छायाचित्र

उपनगरांमध्ये चोरीच्या घटना वाढल्या

पुणे: रस्त्याकडेला थांबलेल्या नागरिकांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हडपसर परिसरात नागरिकांचे मोबाईल जबरदस्तीने चोरून नेण्याच्या दोन घटना घडल्या असून या प्रकरणी हडपसर पोलीस (Hadapasar Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Pune Crime News)

हडपसरमधील मगरपट्टा परिसरातील कालिका डेअरीजवळ १८ वर्षीय डिलिव्हरी बॉय मोबाईलवरील झोमॅटो ॲपमध्ये लोकेशन पाहण्यात व्यस्त होता. त्याचे आपल्या कामाकडे लक्ष होते हे पाहून दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसका मारून क्षणात लंपास केला. त्यानंतर मगरपट्टा चौकातील लोहिया गार्डन येथे ३८ वर्षीय नागरिक ३० डिसेंबरच्या रात्री पावणे दहाच्या सुमारास रस्त्याकडेला मोबाईलमध्ये व्हॉट्स ॲपवर आलेले मेसेज पाहात होते. त्यांचे मोबाईलवर असलेले लक्ष पाहून दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्या हातातील दहा हजार किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसका मारून पळवला. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि त्याची किमत किमान दहा हजारांच्या आसपास असते. मोबाईल कितीही जुना असला तरी तो दीड-दोन हजाराला विकला जातो. यामुळे एक मोबाईल लंपास केला तरी दिवसाचा खर्च निघत असल्याने मोबाईल चोरीच्या घटना उपनगरांमध्ये वाढताना दिसत आहेत. तसेच अशा घटना फारशा वर्दळ नसलेल्या उपनगरात घडत आहेत. या भागात बंदोबस्तही तसा किमान असतो. त्यामुळे मोबाईल घेऊन पलायन करणे तसे सोपे असते.   

जखमी महिलेचे निधन

भरधाव दुचाकीने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. ही घटना २९ डिसेंबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास खडकीजवळील नवीन होळकर पुलाजवळ घडली. बबिता दिगंबर गायकवाड (वय ४७, रा. दापोडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सूरज गायकवाड (वय २५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अनोळखी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सूरज गायकवाड यांच्या आई बबिता गायकवाड व त्यांची मैत्रीण अशा दोघीजणी सकाळी साडेसहाच्या सुमारास खडकी येथील नवीन होळकर पुलाजवळील आर्मी गेटसमोरून रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी भरधाव दुचाकीने गायकवाड यांना जोरात धडक दिली.

या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यावेळी दुचाकीस्वाराने पोलिसांना खबर देणे किंवा जखमी महिलेस रुग्णालयात नेण्याचे टाळून तेथून पळ काढला. त्यांना त्यांच्या नातेवाइकांनी उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना शुक्रवारी (ता. ५) गायकवाड यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश चव्हाण करत आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest