Pune Crime News: रिक्षांचे डिस्क-टायर चोरणारे गजाआड

पुणे : रस्त्याच्या कडेला लावलेल्या सहा ऑटोरिक्षांचे रिमसकट टायर लंपास करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police) गुन्हा दाखल करीत तपासाला सुरुवात केली होती.

Pune Police News

रिक्षांचे डिस्क-टायर चोरणारे गजाआड

मुंढवा पोलीस ठाण्याची कारवाई

पुणे : रस्त्याच्या कडेला लावलेल्या सहा ऑटोरिक्षांचे रिमसकट टायर लंपास करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police) गुन्हा दाखल करीत तपासाला सुरुवात केली होती. या चोरट्यांचा माग काढण्यात पोलिसांना यश आले असून याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

वाजिद युनुस अन्सारी (वय २२, रा. सय्यदनगर, हडपसर), झैद जविद शेख (वय २२, रा.. काळेपडळ, हडपसर) असे अटक आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बाळकोटगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढवा येथील भीमनगर भागात रस्त्याच्या कडेला लावलेल्या ऑटोरिक्षांची चाके चोरीला जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. एकाच दिवसांत सहा ऑटोरिक्षांच्या समोरील आणि पाठीमागील बाजूची अशी एकूण १० चाके चोरीला गेलेली होती. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Pune Police News)

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी व पड़ताळणी केली. गुन्ह्याची पद्धत समजून घेत संशयित आरोपींची माहिती घेण्यास सुरुवात करण्यात आली. दरम्यान, तपास पथकातील पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे यांना खबऱ्यामार्फत वाजीड आणि झैद यांच्याबाबत माहिती मिळाली. हे दोघेही हडपसर -मुंढवा रोडवरील पूलाखाली येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा लावला. या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी चोरी करण्यासाठी आरोपींनी वापरलेली ०१ तीन चाकी रिक्षा, १० डिस्क-टायर, ०१ स्टील-टायर खोलण्याचा पाना असा एकुण ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार राकेश बोबड़े करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, सहायक पोलीस फौजदार संतोष जगताप, पोलीस अंमलदार दिनेश भांडुर्गे, संतोष काळे, राहूल मोरे, राकेश बोबडे  यांनी केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest