Pune : शिधापत्रिकेचे काम करून देण्यासाठी लाच

शिधा पत्रिकेचे काम करून देण्यासाठी पुरवठा विभागाच्या 'साहेबां'च्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडण्यात आले. जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीसमोरील पदपथावर ही कारवाई करण्यात आली.

Pune : शिधापत्रिकेचे काम करून देण्यासाठी लाच

संग्रहित छायाचित्र

पुणे : शिधा पत्रिकेचे काम करून देण्यासाठी पुरवठा विभागाच्या 'साहेबां'च्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडण्यात आले. जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीसमोरील पदपथावर ही कारवाई करण्यात आली.

शंकर शीवाजी क्षिरसागर (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ६७ वर्षीय तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या नावे असलेली शिधापत्रिका बऱ्याच काल वापरात नव्हती. त्यामुळे ही शिधापत्रिका पूर्ववत करण्यासाठी, तसेच  अन्न धान्य पुरवठा सुरू करण्यासाठी ते जुनी जिल्हा परिषद कार्यालयातील पुरवठा अधिकारी यांना भेटायला गेले होते. या ठिकाणी असलेल्या शंकर क्षीरसागर याने या ज्येष्ठ नागरिकाला भेटून 'साहेबांचे काम मी करतो.  तुमचे रेशनकार्ड काढून देतो' असे सांगितले. काम करून देण्यासाठी सुरुवातीला साडेचार हजार रुपये मागितले. याबाबत एसीबीकडे तक्रार करण्यात आली. शिधापत्रिकेचे काम करून देण्यासाठी साहेबांना पैसे द्यावे लागतील असे सांगत  तडजोडीअंती २ हजार ८०० रुपयांची लाच मागितली. ही लाच स्वीकारताना त्याला पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर, पोलीस नाईक वनिता गोरे, पोलीस शिपाई सौरभ महाशब्दे, चालक कदम यांनी केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest