पुणे: महादेव अ‍ॅपप्रकरणी नारायणगावमध्ये कारवाई

नारायणगाव: देशभरात गाजत असलेल्या महादेव अ‍ॅपप्रकरणी नारायणगावमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या विविध पथकांनी थेट कारवाई करीत छापेमारी केली. तीन मजली इमारतीचा पोलिसांनी ताबा घेतला असून जवळपास ७० ते ८० जणांचे पथक कारवाईमध्ये सहभागी झाले होते.

महादेव अ‍ॅपप्रकरणी नारायणगावमध्ये कारवाई

तीन मजली इमारत पोलिसांच्या ताब्यात; कारवाईत ७० ते ८० जणांचे पथक सहभागी

नारायणगाव: देशभरात गाजत असलेल्या महादेव अ‍ॅपप्रकरणी (Mahadev App) नारायणगावमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या विविध पथकांनी थेट कारवाई करीत छापेमारी केली. तीन मजली इमारतीचा पोलिसांनी ताबा घेतला असून जवळपास ७० ते ८० जणांचे पथक कारवाईमध्ये सहभागी झाले होते. स्वतः पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यामध्ये सहभागी झाले होते. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. परदेशासह भारतात विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या कारवाईनंतर महादेव ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपची पाळेमुळे नारायणगावपर्यंत पोहचल्याने खळबळ उडाली आहे.

ऑनलाइन सट्टेबाजीसाठी डिझाईन केलेल्या महादेव बेटिंग अ‍ॅपवर यूजर्स पोकर, कार्ड गेम्स, चान्स गेम्स नावाचे लाईव्ह गेम्स खेळले जातात. क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉलसारख्या खेळांसोबतच निवडणुकांवर अवैध सट्टा लावला जायचा. याचे सर्वाधिक खाते छत्तीसगडमध्ये उघडण्यात आले होते. त्यामुळे महादेव ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप प्रकरणी छत्तीसगडचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांचेही नावही चर्चेत आले होते. तेव्हापासून महादेव बेटिंग अ‍ॅपप्रकरणी तपास सुरू आहे. या प्रकरणाची पाळेमुळे आता पुण्यातील नारायणगाव इथंपर्यंत पोहोचल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत समोर आले आहे. 

ग्रामीण पोलिसांकडून नारायणगावात बुधवारी एका इमारतीवर छापेमारी करण्यात आली. या संपूर्ण इमारतीत महादेव बेटिंग अ‍ॅपचं काम सुरू असल्याचे समोर आले. विशेषतः परप्रांतीय तरुण बुकिंगचे काम करत होते. घटनास्थळी बुकिंगसाठी वापरले जाणारे मोबाईल, लॅपटॉप आदि साहित्य आढळून आले आहे. पुणे जिल्ह्यातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू आहे. 

"नारायणगाव येथील एका तीन मजली इमारतीत काहीजण महादेव बेटिंग अ‍ॅपचे काम करत असल्याची माहिती मिळाली होती. प्राथमिक स्वरूपात चौकशी सुरू असून पंचनामा करण्यात येत आहे."
- पंकज देशमुख, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण

महादेव अ‍ॅपचे बॉलीवूड कनेक्शन
आयटी कायद्याचे उल्लंघन व मनी लॉड्रिंग प्रकरणी सरकारने गेल्या वर्षी महादेव बेटिंग अ‍ॅप व वेबसाइटवर बंदी घातली होती. या प्रकरणात ईडीने मोठी कारवाई करत बॉलिवूड सेलिब्रिटी व राजकारण्यांची चौकशी केली आहे. अभिनेता साहिल खान याला अटक करून त्याचीही चौकशी करण्यात आली आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest