पुणे: पुण्य आणि स्वर्गाचे आमिष दाखवीत डॉक्टरची ५ कोटी ३८ लाख रुपयांची फसवणूक

पुणे : व्यवसायाने डॉक्टर असलेल्या एका जेष्ठ नागरिकाला वेळोवेळी गोड बोलून धार्मिक गोष्टी सांगून प्रभावित करण्यात आले. त्यांना पुण्य कमावून स्वर्ग मिळवण्याचे आमिष दाखवीत वेगवेगळ्या मालमत्तांचे एकूण ११ बक्षीसपत्र करून घेण्यात आली.

संग्रहित छायाचित्र

कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : व्यवसायाने डॉक्टर असलेल्या एका जेष्ठ नागरिकाला वेळोवेळी गोड बोलून धार्मिक गोष्टी सांगून प्रभावित करण्यात आले. त्यांना पुण्य कमावून स्वर्ग मिळवण्याचे आमिष दाखवीत वेगवेगळ्या मालमत्तांचे एकूण ११ बक्षीसपत्र करून घेण्यात आली. तसेच, त्यांच्याकडून रोख रक्कम, सोन्याच्या वस्तू आणि सोन्याची बिस्किटे आदी कोट्यावधी रुपयांची मालमत्ता उकळण्यात आली. अशा प्रकारे या डॉक्टरची तब्बल पाच कोटी ३७ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये भारतीय दंड विधान ४२०, ४०६, ३२३, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार १७ ऑक्टोबर २०१८ पासून ११ एप्रिलपर्यंत घडला. (Pune Crime News)

सादिक अब्दुलमजीद शेख, यास्मिन सादिक शेख, एतेशाम सादिक शेख, अम्मार सादिक शेख (सर्व रा. हार्मनी सोसायटी, कोंढवा-बिबवेवाडी रोड, गुलटेकडी), राज आढाव उर्फ नरसु अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी डॉ. अहमदअली इनामअली कुरेशी (वय ६७, रा.  मेफेयर एलिगंझा, एनआयबीएम रोड, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सादिक त्यांची पत्नी यास्मिन, मुले एतेशाम आणि अम्मार या सर्वांनी मिळून डॉक्टरशी चांगले संबंध प्रस्थापित केले. वेळोवेळी त्यांच्याशी गोड बोलून त्यांना धार्मिक गोष्टी सांगण्यास सुरुवात केली. अधिकाधिक पुण्य कमावले पाहिजे. धर्म पाळल्यास आणि पुण्य कमावल्यास स्वर्ग मिळेल असे आमिष त्यांना दाखविण्यात आले.

 त्याद्वारे गोड बोलून त्यांच्याकडून वेगवेगळ्या मालमत्तांची एकूण ११ बक्षिस पत्रे स्वतःच्या नावाने करून घेतली. यासोबतच त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम, सोन्याच्या वस्तू, सोन्याची बिस्किटे आदी प्रकारची मालमत्ता स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता त्यांच्याकडून उकळण्यात आली. डॉक्टरने हा प्रकार लक्षात आल्यानंतर सर्व मालमत्ता परत मागितली. परंतु, त्यांनी ते देण्यास नकार दिला. अशा प्रकारे त्यांच्या कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेचा अपहार करून फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) पाटील करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest