पुणे: नायडू रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहतीतून चार लाखांची चोरी

पुणे: नायडू रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहतीतील घरातून चोरट्यांनी चार लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 23 Jul 2024
  • 03:20 pm
Naidu Hospital Staff Colony, Theft, Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

पुणे: नायडू रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहतीतील घरातून चोरट्यांनी चार लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली.

याबाबत एका महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला नायडू रुग्णालयाच्या सेवक वसाहतीत राहायला आहेत. घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरटा शिरला. चोरट्याने कपाटातून तीन लाख ९१ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले.

दरम्यान, नारायण पेठेतील लोखंडे तालीम परिसरातील एका सदनिकेतून चोरट्यांनी दोन मोबाइल संच चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. तक्रारदार तरुण आणि त्याची पत्नी लोखंडे तालीम गणपतीजवळ असलेल्या एका सोसायटीत राहायला आहेत. तक्रारदार तरुणाने दोन मोबाइल संच खिडकीजवळ ठेवले होते. चोरट्याने खिडकीत ठेवलेले दोन मोबाइल संच चोरून नेले. 

साहाय्यक फौजदार जाधव तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest