Crime News: अवैध दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

पिंपरी चिंचवड: अवैध दारूभट्टीवर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी (MIDC Bhosari Police) छापा मारून कारवाई केली. त्यात 80 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला. ही कारवाई मंगळवारी (दि. 9) रात्री इंद्रायणी

संग्रहित छायाचित्र

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दिली फिर्याद

पिंपरी चिंचवड:  अवैध दारूभट्टीवर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी (MIDC Bhosari Police) छापा मारून कारवाई केली. त्यात 80 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला. ही कारवाई मंगळवारी (दि. 9) रात्री इंद्रायणी नदीच्या काठावर मोशी येथे करण्यात आली.

चंदू चिमा कुंभार (वय 47, रा. हवालदार वस्ती, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार नितीन खेसे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चंदू कुंभार याने मोशी येथे इंद्रायणी नदीच्या काठावर बेकायदेशीरपणे हातभट्टी दारूची भट्टी लावली. त्याने 1600 लिटर गावठी दारू तयार करण्यासाठी रसायन एकत्र केले. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करत 80 हजारांचा ऐवज नष्ट केला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest