Pune Crime : सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त

गुन्हे शाखेच्या युनिट (Crime Branch) तीनच्या पथकाने सराईत गुन्हेगारावर कारवाई करीत एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त केली आहेत. त्याच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त

पुणे : गुन्हे शाखेच्या युनिट (Crime Branch) तीनच्या पथकाने सराईत गुन्हेगारावर कारवाई करीत एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त केली आहेत. त्याच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच दोन तडीपार गुंडांना पकडून स्थानिक लोणीकंद पोलिसांच्या (Lonikand Police) ताब्यात देण्यात आले आहे.

अक्षय आनंदा चौधरी (Aksdhay Chaudhari) (वय २५, रा. मु. पो. नांदोशी, ता. हवेली) याच्याकडे बेकायदा पिस्तूल असल्याची माहिती सहायक पोलीस फौजदार संतोष क्षीरसागर यांना मिळाली होती. चौधरी याच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेत कॅनोल रोडवरील हॉटेल विदर्भ समोर सापळा लावला. त्याला शिताफीने ताब्यात घेत अंगझडती घेण्यात आली. त्याच्याकडे एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा ४१ हजारांचा मुद्देमाल मिळून आला. त्याच्याविरूध्द पोलीस शिपाई साईकुमार तुकाराम कारके,यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिंहगड रोड पोलीस ठाण्यात येथे आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच परीमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी तडीपार केलेले आरोपी अमन उर्फ मुन्ना दस्तगीर पटेल (वय २३, रा. गाडेवस्ती, बकोरी फाटा, वाघोली), विशाल उर्फ इशाप्पा जगन्नाथ पंदी (वय २२, रा. बकोरी फाटा, वाघोली) यांना देखील पकडण्यात आले आहे. त्यांच्यावर  विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस उप-निरीक्षक अजितकुमार पाटील, पोलीस अंमलदार संतोष क्षिरसागर, शरद वाकसे, किरण पवार, संजिव कळंबे, सोनम नेवसे, सुजीत पवार, राकेश टेकावडे, सतीश कत्राळे, साईनाथ पाटील, साईनाथ कारके, ज्ञानेश्वर चित्ते, यांचे पथकाने केली आहे. पुढील तपास सहायक फौजदार संतोष क्षिरसागर करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest