संग्रहित छायाचित्र
रावेत: कर्जाची परतफेड न केल्याने बॅंकेने जप्त केलेल्या फ्लॅटचे लॉक तोडून त्याचा ताबा घेतल्याबद्दल एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ ते १७ ऑक्टोबर २०२३ दरम्यान निसर्गदर्शन को. ऑप हाऊसिंग सोसायटी येथे हा प्रकार घडला. (Pimpri Chinchwad News)
विजय राघोबाजी सोनकुसरे (वय ५९, रा. पुणे) यांनी या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेने फ्लॅट तारण ठेवून बॅंक ऑफ इंडियाच्या देहूरोड शाखेकडून ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांना हे कर्ज वेळेत फेडता न आल्याने जिल्हादंडाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बॅंकेने आरोपी महिलेने तारण ठेवलेला फ्लॅट जप्त केला. मात्र, आरोपी महिलेने बॅंकेने जप्त केलेल्या फ्लॅटचे लॉक तोडून फ्लॅटचा पुन्हा ताबा घेतला.