Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड हादरलं! जुन्या रागातून अल्पवयीन मित्राच्या डोक्यात दगड घालून खून

सोशल मीडियाच्या ग्रुपवर आपलेच वर्चस्व राहावे तसेच जुन्या भांडणाचा राग मनात धरून मित्राने आपल्याच मित्राचा डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केला. एवढेच नाही तर खून करतानाचा व्हीडीओ काढून तो सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याचा धक्कादायक प्रकार

Pimpri Chinchwad Crime

जुन्या रागातून मित्राच्या डोक्यात दगड घालून खून

खून करताना व्हीडीओ काढत सोशल मीडियावर केला व्हायरल

सोशल मीडियाच्या ग्रुपवर आपलेच वर्चस्व राहावे तसेच जुन्या भांडणाचा राग मनात धरून मित्राने आपल्याच मित्राचा डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केला. एवढेच नाही तर खून करतानाचा व्हीडीओ काढून तो सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (२६ फेब्रुवारी) रात्री चाकण येथे घडला. (Pimpri Chinchwad Crime) 

मेदनकरवाडी येथे राहणाऱ्या सतरा वर्षीय मुलाचा खून झाला आहे. या प्रकरणी त्याच्या ६५ वर्षीय आजोबांनी चाकण पोलीस (Chakan Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, खून करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलावर २०२३ मध्ये खेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. मृत मुलगा आणि दोन्ही आरोपी हे मित्र आहेत. मृत मुलगा गुन्हेगार असल्याने स्वतःला नेहमीच भाई समजत असे. त्यामुळे तो नेहमीच मित्रांना हाणामारी करायचा. सोमवारी दिवसभर मयत मुलगा आणि दोन्ही आरोपी मुले बियर पिले. दारूच्या नशेत त्यांची एकमेकांबरोबर भांडणे झाली. या रागातून आरोपींनी मृत मुलाच्या डोक्यात दगड घालून खून केला.

आरोपी एवढे दारू पिले होते की आपण काय करत आहोत आणि काय गुन्हा केला आहे, याचे भान त्यांना नव्हते. खून केल्यानंतर त्यांनी ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना आपण खून केल्याची माहिती दिली. मात्र, त्यानंतर पोलीस आपल्याला पकडतील या भीतीने ते मोबाईल टाकून पळून गेले. पोलिसांनी माग काढत त्यांना ताब्यात घेतले. मृत मुलगा आणि दोन आरोपी यांनी शाळा सोडली होती. परिसरात भाईगिरी करत फिरणे, हा त्यांचा नित्यक्रम होता. भाईगिरीमुळेच त्यांच्यात खुन्नस झाली होती. त्यातूनच हा गुन्हा घडला आहे.

भीती वाटल्याने केला व्हीडीओ डिलिट...

आरोपी असलेल्या दोघांपैकी मुख्य आरोपी मुलावर हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत. मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केल्यानंतर नशेतच त्यांनी व्हीडीओ तयार केला. व्हीडीओ तयार करताना पुन्हा मित्राच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर हा व्हीडीओ सोशल मीडियावर टाकला. मात्र, नशा कमी होताच आरोपींनी तो  डिलिट केला.

मृत आणि आरोपी हे मित्र आहेत. तसेच सर्वजण अल्पवयीन आहेत. दारूच्या नशेत जुन्या वादातून त्यांच्यात भांडणे झाली. त्यातून आरोपींनी मित्राचा डोक्यात दगड घालून खून केला. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन बालन्यायालयाकडे सुपूर्द केले आहे.

- राजेंद्रसिंह गौर, सहायक पोलीस आयुक्त, चाकण विभाग

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest