संग्रहित छायाचित्र
पीएमपीएमएलच्या बसने प्रवास करीत असताना अज्ञात चोरट्याने एका ज्येष्ठ नागरिकाची सोन्याची चेन चोरून नेली. ही घटना मंगळवारी सकाळी सव्वादहा वाजताच्या सुमारास काळेवाडी फाटा ते जगताप डेअरी या दरम्यान घडली.
भाऊराव नरहरी जाधव (वय ८५, रा. दत्तराज कॉलणी, पवार नगर, थेरगाव) यांनी मंगळवारी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची पत्नी शकुंतला असे पीएमपीएमएलच्या ३६ नंबर बसने केळकर हॉस्पिटल, पुणे येथील डोळ्याचे हॉस्पिटल येथे जाण्याकरिता काळेवाडी फाटा येथून बसमध्ये बसले. ते जगताप डेअरी चौक येथे आले असता त्यांना आपल्या गळ्यातील ५० हजार रुपये किंमतीची १३ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.