Pimpri Chinchwad: नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची तब्बल ७ लाख रुपयांची फसवणूक

पिंपरी चिंचवड: तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का असे विचारणा करून तरुणाला ऑनलाइन पद्धतीने तब्बल सात लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. हा सारा प्रकार

Pimpri Chinchwad News

संग्रहित छायाचित्र

वाकड पोलिसांनी केला गुन्हा दाखल आरोपीचा शोध सुरू

पिंपरी चिंचवड: तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का असे विचारणा करून तरुणाला ऑनलाइन पद्धतीने तब्बल सात लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. हा सारा प्रकार २८ सप्टेंबर २०२३ आणि २९ सप्टेंबर २०२३ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने थेरगाव येथे घडला.

याप्रकरणी ३० वर्षीय तरुणाने वाकड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.२ ) फिर्यादी दिली आहे. फिर्यादीवरून व्हाट्सअप क्रमांकधारक व दोन टेलिग्राम आयडीधारक तसेच विविध बँक खातेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने त्यांच्या व्हाट्सअप क्रमांक वर मेसेज पाठवून तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का अशी विचारणा केली. यावेळी फिर्यादी यांनी त्याला प्रतिसाद दिल्यानंतर आरोपीने फिर्यादीला टेलिग्रामद्वारे टास्क देऊन ते टास्क पूर्ण करून पैसे कमावण्याचे आमिष दाखवले . यावेळी त्यांना टास्कसाठी वेगवेगळ्या बँकेत रक्कम जमा करण्यास लावून त्यांच्याकडून एका दिवसात तब्बल ७,०३,०२७  रुपयांची फसवणूक केली. यावरून वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest