Pimpri : पिंपरी येथून साडेसात किलो गांजासह एकाला अटक

साडेसात किलो गांजा सह एकाला पिंपरी येथील संत तुकाराम नगर येथून अटक केली आहे. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी (६ डिसेंबर) दुपारी केली आहे.

 Pimpri : पिंपरी येथून साडेसात किलो गांजासह एकाला अटक

संग्रहित छायाचित्र

साडेसात किलो गांजा सह एकाला पिंपरी येथील संत तुकाराम नगर येथून अटक केली आहे. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी (६ डिसेंबर) दुपारी केली आहे.

जितेंद्र मगन कोळी (वय ३३ रा शिरपूर, धुळे) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई कपिलेश इगवे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा संततुकाराम नगर येथील मुख्य अग्निशमन केंद्रासमोर उभारला होता. याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून ७ लाख ४३ हजार ८०० रुपयांचा सात किलो ४३८ ग्रॅम वजनाचा गांजा व १५ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ७ लाख ५८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपी हा तेथे गांजा विक्रीसाठी आल्याचे तपासात उघड झाले आहे. आरोपीवर पिंपरी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस अॅक्ट. अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest