संग्रहित छायाचित्र
देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसासाह एकाला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाका एकच्या पथकाने चिखली येधून अटक केली आहे. ही कारवाई साने चौकाजवळील मोकळ्या मैदानात बुधवारी (६ डिसेंबर) करण्यात आली.
संगमेश्वर उर्फ पप्पू गंगाधर येवते (वय ३४ रा.आकुर्डी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा एक चे पोलीस शिपाई अजित रुपनवर यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा साने चौक येथील मोकळ्या मैदानात शस्त्रासह फिरत असल्याचे खबर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून १ देशीबनावटीचे पिस्टल व १ जिवंत काडतूस असा एकूण २१ हजार रुपयांची शस्त्रे जप्त करण्यात आली. चिखली पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.