दर्ग्याला पैसे दान करण्याचा बहाणा करत दिड लाखांचे गंठण केले लंपास

पिंपरी चिंचवड: दर्ग्याला पैसे दान करण्याचा बहाणा करून एका महिलेचे दिड लाखांचे गंठण लंपास केले आहे. ही घटना मंगळवारी (१६ जानेवारी) चाकण येथे घडली आहे. याप्रकरणी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली

Pimpri Chinchwad Crime

संग्रहित छायाचित्र

चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड: दर्ग्याला पैसे दान करण्याचा बहाणा करून एका महिलेचे दिड लाखांचे गंठण लंपास केले आहे. ही घटना मंगळवारी (१६ जानेवारी) चाकण येथे घडली आहे. याप्रकरणी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. (Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या दुकानात असताना आरोपी तेथे आला व त्याने महिलेला मला दर्ग्याला दान करायचे आहे. त्या दानाला सोने लावून द्या अशी भुरळ फिर्यादी यांना पाडली. फिर्यादीने विश्वासाने त्यांचे साडेतीन तोळ्याचे गंठण काढून आरोपीला दिले. त्याने फिर्यादी समोर प्लॅस्टीकच्या बॅगमध्ये फुले व लाल कपडा मध्ये टाकून हात चालाखीने फिर्यादींचे दीड लाख रुपयांचे गंठण लंपास केले. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Share this story

Latest