गुप्तदान करण्याचा बहाणा करत महिला व्यावसायिकाचे दागिने केले लंपास

पिंपरी चिंचवड: गुप्तदान करण्याचा बहाणा करून व्यावसायिकाचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. हा सारा प्रकार मंगळवारी (१६ जानेवारी) निगडी गावठाण येथील वैष्णवी जनरल स्टोअर येथे घडला आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात

संग्रहित छायाचित्र

निगडी पोलीस ठाण्यात महिलेने दिली फिर्याद

पिंपरी चिंचवड: गुप्तदान करण्याचा बहाणा करून व्यावसायिकाचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. हा सारा प्रकार मंगळवारी (१६ जानेवारी) निगडी गावठाण येथील वैष्णवी जनरल स्टोअर येथे घडला आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात महिलेने फिर्याद दिली असून अनोळखी इसमावर गुन्हा दाखल केला आहे. (Pimpri Chinchwad Crime news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या दुकानात असताना साधारण ४५ ते ५० वर्षाचा वयाचा व्यक्ती त्यांच्या दुकानात आला. त्याने साईबाबांना मंदिरात गुप्तदान करायचे आहे. अशी भुरळ पाडून फिर्यादी यांच्याकडील ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण व दोन अंगठ्या असा एकूण ८१ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस याप्रकरणचा पुढील तपास करत आहेत.

Share this story

Latest