कॉलेजला जाणाऱ्या तरुणीची छेडछाड; आरोपी अटकेत

पुणे: कॉलेजला जाणाऱ्या तरुणीचा पाटलाग करत तसेच तीचा हात पकडत तीची छेडछाड करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. तळेगाव दाभाडे येथिल इंद्रायणी कॉलेज रस्त्यावर

संग्रहित छायाचित्र

तळेगाव दाभाडे येथिल इंद्रायणी कॉलेज रस्त्यावरील घटना

पुणे: कॉलेजला जाणाऱ्या तरुणीचा पाटलाग करत तसेच तीचा हात पकडत तीची छेडछाड करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. तळेगाव  दाभाडे येथिल इंद्रायणी कॉलेज रस्त्यावर ५ ते ८ जानेवारी या कालावधीत ही घटना घडली. 

पिडीत तरुणीने या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दस्तगिर साहेबखान पठाण (वय २४, रा. रहाटणी) याला अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी कॉलेजला जात असताना आरोपी त्यांच्या पाटलाग करत असे. तसेच फिर्यादी रस्त्याने जाताना आरोपीने त्यांचा हात पकडत त्यांच्याशी गैरवर्तन केले. तु कोठेही गेली तरी तुला सोडणार नाही, तुला पाहून घेतो, अशी धमकी आरोपीने दिली. तळेगाव दाभाडे पोलिस तपास करत आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest