Crime News: बस प्रवासात ७७ हजारांचे दागिने पळवले

पुणे: वाकडेवाडी ते बोपोडी दरम्यान पीएमपी बस मधून प्रवास करत असलेल्या महिलेचे ७७ हजार रुपये किमतीचे दागिने दोन अनोळखी महिलांनी चोरून नेले. ही घटना सोमवारी

Theft

संग्रहित छायाचित्र

महिलेने दिली देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद

पुणे: वाकडेवाडी ते बोपोडी दरम्यान पीएमपी बस मधून प्रवास करत असलेल्या महिलेचे ७७ हजार रुपये किमतीचे दागिने दोन अनोळखी महिलांनी चोरून नेले. ही घटना सोमवारी (८ जानेवारी) दुपारी दोन ते चार वाजता च्या कालावधीत घडली. (Pimpri Chinchwad Crime News) 

याप्रकरणी महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehuroad Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला डेक्कन ते निगडी असा पीएमपीएमएल बसने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान दोन महिलांनी फिर्यादी यांच्या नकळत एका पिशवी मधील ७७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हातचलाखी करून चोरून नेले. देहूरोड पोलिसांनी हा गुन्हा खडकी पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. खडकी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest