CIVIC MIRROR IMPACT: फौजदाराला भोवले कलमाचे अज्ञान

पिंपरी चिंचवड: सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या ४९७ कलमाखाली गुन्हा दाखल करणे वाकड पोलीस ठाण्यातील एका फौजदाराला चांगलेच भोवले आहे. रद्द केलेले कलम दाखल केल्याने पोलीस आयुक्तांनी थेट

Pimpri Chinchwad Police

संग्रहित छायाचित्र

रद्द झालेले कलम लावल्याने थेट कंट्रोलला बदली, पोलीस आयुक्तांनी दिले संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश

पिंपरी चिंचवड: सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या ४९७ कलमाखाली गुन्हा दाखल करणे वाकड पोलीस ठाण्यातील एका फौजदाराला चांगलेच भोवले आहे. रद्द केलेले कलम दाखल केल्याने पोलीस आयुक्तांनी थेट संबंधित फौजदाराला कंट्रोलला (नियंत्रण कक्ष) संलग्न केले आहे. तसेच या विभागाचे सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) यांना या सर्व प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. (pimpri chinchwad news) 

मकसुद मणेर असे त्या फौजदाराचे नाव आहे. मणेर यांची नेमणूक वाकड पोलीस ठाण्यात आहे, तर वाकड विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांना या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहेत. त्याचबरोबर याबाबत 'सीविक मिरर'ने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबत पोलिसांकडे विचारणा केली होती. त्यानंतर पोलिसांकडून लेखी पत्राद्वारे महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्याकडे लेखी स्वरूपात दिलगिरी देखील व्यक्त केली आहे.

डिसेंबर २०२३ अखेर, पत्नीला पुरुषाची मालमत्ता मानणारे भारतीय दंड विधान संहितेतील कलम ४९७ सर्वोच्च न्यायालयाने रद्द करूनही पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील वाकड पोलिसांनी या कलमाखाली गुन्हा दाखल केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. पत्नीला तिच्या प्रियकरासोबत विवस्त्रावस्थेत एका लॉजमध्ये शारीरिक संबंध ठेवत असताना पकडल्याची तक्रार पतीने केल्यावर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.

पूर्वी भारतीय दंड विधान संहितेमध्ये कलम ४९७ खाली व्यभिचार हा गुन्हा ठरवलेला होता. या कलमानुसार एखादी स्त्री दुसऱ्या व्यक्तीची पत्नी आहे असे ज्ञात असताना आणि अशा व्यक्तीच्या संमतीशिवाय त्या व्यक्तीच्या पत्नीसोबत ठेवलेले शारीरिक संबंध हा बलात्कार ठरत नसला तरी व्यभिचार असून अशा गुन्हेगारास पाच वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंडाची तरतूद होती. मात्र असा गुन्हा घडण्यासाठी अशा स्त्रीला गुन्हा घडण्यास प्रवृत्त केले म्हणून शिक्षा करता येत नाही. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कलम ४९७ हे पत्नीला पतीची मालमत्ता म्हणून अधिकार प्रदान करत असल्यामुळे ते घटनेच्या समानतेच्या तत्त्वाचा भंग करत असल्याचे मत नोंदवले. कारण असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीच्या पीडित पत्नीला यामध्ये गुन्हा दाखल करण्याचा अधिकार नाही. त्याचबरोबर ४९७ हे दुसऱ्या बाजूने पुरुषांसाठीदेखील भेदभाव करणारे होते. म्हणजे व्यभिचारामध्ये पुरुष आणि स्त्री हे दोघेही जबाबदार असताना त्यामध्ये फक्त पुरुषालाच शिक्षा करण्याची तरतूद होती. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीचे कलम ४९७ ला वैध ठरवणारे आपले निर्णय फिरवत या कलमाला रद्द ठरवले आहे. तरीही वाकड पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्याने त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

२८ डिसेंबरला वाकडमधील एका लॉजमध्ये हा प्रकार घडला होता. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने पतीने बाहेरगावी जाण्याचा बहाणा करून तिच्यावर पाळत ठेवली. ती घरातून बाहेर पडल्यावर लॉजपर्यंत पाठलाग केला. लॉजमध्ये प्रियकरासोबत असताना दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि दोघांनाही निर्वस्त्र अवस्थेत शारीरिक संबंध ठेवत असतानाच पकडले. त्याची तक्रार दिल्यावर पोलिसांनी कलम ४९७ प्रमाणे व्यभिचाराचा गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील एका व्यावसायिकाला पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे त्याने बाहेरगावी जात असल्याचा बहाणा करून पत्नीवर पाळत ठेवली. पत्नी घराच्या बाहेर पडल्यावर त्याने पाठलाग सुरू केला. ती वाकडमधील एका लॉजवर आली. त्यानंतर तिचा प्रियकरही तेथे आला. त्यानंतर दहा-पंधरा मिनिटांनी पतीने आपल्या मित्राच्या सोबतीने लॉजचा दरवाजा तोडला. दरवाजा तोडल्यावर पत्नी आणि तिचा प्रियकर दोघेही निर्वस्त्र अवस्थेत शारीरिक संबंध ठेवत असल्याचे पतीला दिसले. यावरून त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest