दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

पुणे : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले असून यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

संग्रहित छायाचित्र

पुणे : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapith Police) जेरबंद केले असून यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. कात्रज घाटातील भिलारेवाडी येथील रहिवासी इमारतीमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी या सर्वांना पकडले. ही कारवाई बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. 

रोहन गोविंद धुमाळ (वय २०, रा. झेड कॉर्नर, लक्ष्मी हाईटस, मांजरी, हडपसर) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या १७, १५, १६ वर्षीय तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील दोन मुले कात्रज येथे राहणारी आहेत. तर, एक मुलगा हडपसर येथे राहणारा आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस फौजदार नामदेव रेणुसे (वय ५५) यांनी फिर्याद दिली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात भादवि ३९९, ४०२, महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) सह १३५, व आर्म ॲक्ट ३ (२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भिलारेवाडी येथील रहिवासी इमारतीमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी भिलारेवाडी परिसरात सापळा लावला. या ठिकाणी आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन लोखंडी कोयते, मिरची पावडर, दुचाकी गाड्या असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अनिल भोसले करीत आहेत. (Pune Crime News)

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest