कंपनीला जागा देण्याच्या बहाण्याने तब्बल सव्वा कोटींची फसवणूक; निगडी प्राधिकरण मधील प्रकार

कंपनीला जागा देण्याच्या बहाण्याने १ कोटी २० लाख रुपये घेत कंपनीला जागा न देता कंपनीची फसवणूक (Fraud) केली. हा प्रकार १० जानेवारी ते ३ एप्रिल या कालावधीत निगडी प्राधिकरण येथे घडला.

Fraud

प्रसाद प्रदीप कोंडे देशमुख (रा. धनकवडी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या जे आर एल रियालटी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला जागा हवी असल्याने फिर्यादी जागेचा शोध घेत होत्या. त्यावेळी आरोपीकडे १५ गुंठे जागा असून त्या जागेची किंमत ३ कोटी ९० लाख रुपये ठरवण्यात आली.  त्यानंतर ३० टक्के रक्कम घेऊन विसार पावती करून देतो असे आरोपीने सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी आरटीजीएस द्वारे आरोपीला १ कोटी २० लाख रुपये दिले. पैसे घेतल्यानंतरही इसार पावती करून न देता तसेच घेतलेले पैसे परत न देता फिर्यादीची फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest