Pune Crime News : वैद्यकीय अभ्यासक्रमाला ऍडमिशन देण्याच्या आमिषाने फसवणूक

भारती विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेज आणि सुनीतीभाई शहा आर्युर्वेदिक कॉलेजमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने दोघाजणांची २२ लाख रुपयांची फसवणूक (Fraud) करण्यात आली.

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

पुणे : भारती विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेज आणि सुनीतीभाई शहा आर्युर्वेदिक कॉलेजमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने दोघाजणांची २२ लाख रुपयांची फसवणूक (Fraud) करण्यात आली. हा प्रकार ८ ऑक्टोबर २०२२ ते २ नोव्हेंबर २०२२ या कालावधीदरम्यान दत्तनगर कात्रज येथील फालेनगर येथे घडला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस (Bharti Vidyapith Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News) 

सौरभ सुनील कोडग (Saurabh Sunil Kodag) (वय २२, रा. जमीलनगर,मुंबई), संतोष काशिनाथ पवार (Santosh Kashinath Pawar)  (वय ५०, रा.विरार, वेस्ट ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ओंकार चंद्रकांत पवार (वय २०, रा. वेल्हे) यांनी फिर्याद दिली आहे. कोडग आणि पवार या दोघानी पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांना भारती विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांचा या शैक्षणिक संस्थेशी कोणताही संबंध नसताना पवार यांच्याकडून १३ लाख २० हजार रुपये घेतले. त्यांना बनावट अलॉटमेंट लेटर दिले. तसेच सयाजी मोहिते यांच्याकडून त्यांचा मुलगा आदित्य मोहिते, रुपाली काळे यांची मुलगी सृष्टीप्रिया काळे हिला सुनितीभाई शहा आयुर्वेद महाविद्यालय हडपसर येथे प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले. मोहिते यांच्याकडून ७ लाख रुपये आणि काळे यांच्याकडून १ लाख ९० हजार रुपये उकळले.

त्यांना बनावट बिल व पावत्या देण्यात आल्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पैसे परत माहिती. मात्र, त्यांना शिवीगाळ करीत कुटुंबियांसह सर्वांना जीवे ठार धमकी देण्यात आली. मध्ये 'बीएएमएस' वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने दोघाजणांची ८ लाख ९० हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ८ ऑक्टोबर २०२२ ते २ नोव्हेंबर २०२२ या कालावधीदरम्यान दत्तनगर कात्रज येथील फालेनगर येथे घडला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौरभ सुनील कोडग (वय २२, रा. जमीलनगर,मुंबई), संतोष काशिनाथ पवार (वय ५०, रा.विरार, वेस्ट ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ओंकार चंद्रकांत पवार (वय २०, रा. वेल्हे) यांनी फिर्याद दिली आहे. कोडग आणि पवार या दोघानी पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांना भारती विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांचा या शैक्षणिक संस्थेशी कोणताही संबंध नसताना पवार यांच्याकडून १३ लाख २० हजार रुपये घेतले. त्यांना बनावट अलॉटमेंट लेटर दिले. तसेच सयाजी मोहिते यांच्याकडून त्यांचा मुलगा आदित्य मोहिते, रुपाली काळे यांची मुलगी सृष्टीप्रिया काळे हिला सुनितीभाई शहा आयुर्वेद महाविद्यालय हडपसर येथे प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले. मोहिते यांच्याकडून ७ लाख रुपये आणि काळे यांच्याकडून १ लाख ९० हजार रुपये उकळले.

त्यांना बनावट बिल व पावत्या देण्यात आल्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पैसे परत माहिती. मात्र, त्यांना शिवीगाळ करीत कुटुंबियांसह सर्वांना जीवे ठार धमकी देण्यात आली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest