पुणे : एकीकडे ‘बंदूकबाजां’ची परेड तर, दुसरीकडे उडताहेत गोळ्यांचे ‘बार’; हडपसरच्या शेवाळवाडीत गोळीबाराचा थरार

सिक्युरिटी एजन्सीला लागणारे सुरक्षा रक्षक पळवण्याच्या आणि एकाच भागातील काम घेण्याच्या वादामधून दोन माजी सैनिक व्यावसायिकांमध्ये भर रस्त्यात वाद झाला. त्या वादामधून एका माजी सैनिकाने दुसऱ्या माजी सैनिकावर गोळी झाडली.

Pune Firing

संग्रहित छायाचित्र

सिक्युरिटी एजन्सी’च्या वादातून गोळीबार हडपसरच्या शेवाळवाडीत थरार : एका माजी सैनिकाने दुसऱ्या माजी सैनिकावर झाडली गोळी

पुणे : सिक्युरिटी एजन्सीला लागणारे सुरक्षा रक्षक पळवण्याच्या आणि एकाच भागातील काम घेण्याच्या वादामधून दोन माजी सैनिक व्यावसायिकांमध्ये भर रस्त्यात वाद झाला. त्या वादामधून एका माजी सैनिकाने दुसऱ्या माजी सैनिकावर गोळी(Pune Firing) झाडली. ही गोळी संबंधिताच्या पायाला लागली. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास हडपसरच्या शेवाळवाडीत हा प्रकार घडला. जखमी झालेल्या माजी सैनिकावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस ठाण्याचे व गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी घटणास्थळी दाखल झाले. याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. (pune crime news)

जयवंत खलाटे (Jayvant Khalate)  (वय ५३, रा. भेकराईनगर, हडपसर) असे जखमी झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. याप्रकरणी सुधीर रामचंद्र शेडगे (Sudhir Shendge)  (वय ५३, रा. गोंधळेनगर, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याच्या मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. हडपसर पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार, जयवंत खलाटे यांचा ‘डेल्टा वन ५ सिक्युरिटी’ नावाने सुरक्षा एजन्सी आहे. तर, शेडगे याची ‘फस्ट डिफेन्स सिक्युरिटी’ नावाने सुरक्षा एजन्सी आहे. या दोन्ही एजन्सीकडून हडपसरच्या विविध भागात तसेच विशेषत: शेवाळवाडी भागात सुरक्षा रक्षक दिले जातात. अनेक सोसायटी आणि कंपन्या तसेच खासगी आस्थापना त्यांच्या ग्राहक आहेत. एकाच भागात काम करीत असल्याने त्यांच्यामध्ये एकमेकांचे सुरक्षारक्षक पळविण्यावरुन वाद होते. 

बुधवारी सकाळी त्यांच्यामध्ये पुन्हा या विषयावरून वाद झाले. शेडगे आणि खलाटे हे दोघे शेवाळवाडी येथील टकले बंगला परिसरात  भेटले. त्याठिकाणी त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर शेडगे याने त्याच्याकडील पिस्तुलातून खलाटे यांच्यावर गोळी झाडली. ही गोळी त्यांच्या पायाला लागली. दरम्यान, सतर्क नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्ष आणि पोलीस ठाण्यात फोन करून याची माहिती कळवली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तात्काळ शेडगे याला ताब्यात घेतले. दरम्यान, जखमी खलाटे यांना रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, ही छर्र्याची बंदूक असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत. घटनास्थळावर मिळालेले पुरावे न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest