मोकळ्या जागेत ठेवलेल्या पाईपला आग

पुणे: मोकळ्या जागेत ठेवलेल्या पाईपच्या ढिगाऱ्याला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना रविवारी (७ जानेवारी) शिरगाव ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वाराबाहेर घडली. नागेश बाळासाहेब घायाळ

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

श्री रोकडोबा मंगल कार्यालयाच्या इमारतीच्या भिंतीचे नुकसान

पुणे: मोकळ्या जागेत ठेवलेल्या पाईपच्या ढिगाऱ्याला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना रविवारी (७ जानेवारी) शिरगाव ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वाराबाहेर घडली. नागेश बाळासाहेब घायाळ (वय ३६,रा. हडपसर) यांनी या प्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी शिरगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर ८८ लाख ६२ हजार ७७० रुपये किमतीचे पाईप ठेववले होते. अज्ञात आरोपीने या पाईपच्या ढिगाऱ्याला आग लावून पाईपचे नुकसान केले. या आगित ग्रामपंचायतीच्या आरोग्य केंद्राच्या इमारतीचे व श्री रोकडोबा मंगल कार्यालयाच्या इमारतीच्या पाठीमागच्या भिंतीचे नुकसान झाले. शिरगाव पोलिस तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest