पोलीस ठाण्यातून दमदाटी झाल्याने बारामतीत शेतकऱ्याची आत्महत्या

शेतात अतिक्रमण करणाऱ्यांनी पोलिसांकरवी दमदाटी केल्याचा आरोप करत बारामती तालुक्यातील लाटे गावातील शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. पाटबंधारे विभाग, महावितरण विभाग आणि पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे या शेतकऱ्याने मृत्यूपूर्वी केलेल्या व्हीडीओत म्हटले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Laxman More
  • Tue, 16 Apr 2024
  • 04:38 pm
Farmer Suicide

संग्रहित छायाचित्र

शेतात अतिक्रमण करणाऱ्यांनी पोलिसांकरवी दमदाटी केल्याचा आरोप करत बारामती तालुक्यातील लाटे गावातील शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.  पाटबंधारे विभाग, महावितरण विभाग आणि पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे  या शेतकऱ्याने मृत्यूपूर्वी केलेल्या व्हीडीओत म्हटले आहे.  (Farmer Suicide)

हनुमंत सणस असं शेतकऱ्याचं नाव असून ते लाटे तालुक्यातील रहिवासी आहे. आत्महत्या करण्याअगोदर केलेल्या व्हीडीओमध्ये हनुमंत सणस म्हणतात,  मी हनुमंत २६ फेब्रुवारी २०२४ ला आत्महत्येचा इशारा दिला. मला इतका त्रास दिला आहे की, मी  त्याला कंटाळून आत्महत्या करत आहे. माझे वय ७० वर्षे आहे. माझ्या वावरात अतिक्रमण करून मला दम देतात. माझ्या खिशात या संदर्भात चिठ्ठी लिहिली आहे, वारंवार तक्रार करून हीपोलिसांनी उलट मला, माझ्या भावाला आणि मुलाला दम दिला. जिथे अतिक्रमण केले त्याच जागेत मी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या चिठ्ठीत ज्यांची नावे आहेत ते माझ्या आत्महत्येला जबाबदार असून त्यांना तत्काळ अटक करावी.

शेतकऱ्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  हनुमंत सणस यांचे बंधू जयवंत सणस म्हणाले, स्थानिक पोलिसांनीदेखील आम्हाला त्रास दिला. बारामती तालुक्यातील लाटेमध्ये  सणस यांचे क्षेत्र आहे. सणस यांच्या रानामध्ये येथील परिसरातील शेतकऱ्यांनी विनापरवाना  विद्युत पंप बसवलेले असताना त्या शेतकऱ्यांना सणस यांनी  काढायला सांगितले. सणस यांचे रान मोकळे केले.  त्यानंतर हनुमंत सणस  आणि त्यांचा भाऊ त्या रानामध्ये जेसीबी घेऊन साफसफाई करण्यासाठी गेले असताना सणस यांना दमदाटी केली आणि खोट्या केसेस करू अशी धमकी देखील काही लोकांनी दिली. त्यानंतर वारंवार पोलीस स्टेशनमधून हनुमंत  सणस आणि त्यांचे बंधू यांना फोन येऊ लागले. या भीतीला घाबरून हनुमंत सणस यांनी आत्महत्या केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest