Mahavitaran : महावितरणच्या अभियंता, कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; एकाविरुद्ध फौजदारी गुन्हा

वीजबिलांच्या थकबाकीमुळे घरगुती वीजपुरवठा खंडित केल्यानंतर शेजारून परस्पर अनधिकृत वीज वापरल्याप्रकरणी कारवाई करीत असताना महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Mahavitaran : महावितरणच्या अभियंता, कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; एकाविरुद्ध फौजदारी गुन्हा

संग्रहित छायाचित्र

पुणे : वीजबिलांच्या थकबाकीमुळे घरगुती वीजपुरवठा खंडित केल्यानंतर शेजारून परस्पर अनधिकृत वीज वापरल्याप्रकरणी कारवाई करीत असताना महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या मुळशी विभागातील उरूळीकांचन उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता धम्मपाल पंडित हे सहकारी जनमित्र सुनील शिंदे, अंचल बागडे, अश्विनी गोरे, किरण झेंडे यांच्यासह मंगळवारी (दि. २६) दुपारी २.३०च्या सुमारास थेऊरफाटा, कुंजिरवाडी येथे थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करीत होते. यामध्ये आंबेकरवस्ती येथील लता मोहन दौंडकर यांच्या नावे असलेल्या घरगुती वीजबिलाची ९ हजार १५० रुपयांची थकबाकी होती व वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र वीजजोडणीची तपासणी केली असता या ग्राहकाकडे शेजारच्या वीजग्राहकाकडून अनधिकृत वीजपुरवठा घेतल्याचे आढळून आले.

या वीजचोरीबाबत स्थळपाहणी अहवाल तयार करण्यात आला. यासंदर्भात संबंधित वीजग्राहकांना माहिती देत असताना गणेश दौंडकर याने तेथे येऊन स्थळपाहणीचा अहवाल फाडून टाकला. तसेच माझ्या दारात येण्याचा काय संबंध असे म्हणत उपकार्यकारी अभियंता पंडित व सहकाऱ्यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी महावितरणकडून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी गणेश दौंडकर विरुद्ध कलम ३५३, ३२३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest