Pune Crime : पुण्यात घृणास्पद प्रकार! अंडी कुठे लपवलीस... साडी वर करून दाखव; हॉटेल पार्क ऑर्नेटमध्ये शेफकडून महिलेचा विनयभंग

पुणे-नगर रस्त्यावर असलेल्या शास्त्रीनगर जंक्शन येथे असलेल्या 'हॉटेल पार्क ऑर्नेट' (Hotel Park Ornate) मध्ये काम करणाऱ्या 'शेफ'ने स्वयंपाकी महिलेचा विनयभंग molestatio) करीत तिला साडी वर करण्यास सांगितल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

molestatio

हॉटेल पार्क ऑर्नेटमध्ये शेफकडून महिलेचा विनयभंग

पुणे : पुणे-नगर रस्त्यावर असलेल्या शास्त्रीनगर जंक्शन येथे असलेल्या 'हॉटेल पार्क ऑर्नेट' (Hotel Park Ornate) मध्ये काम करणाऱ्या 'शेफ'ने  स्वयंपाकी महिलेचा विनयभंग (molestatio)  करीत तिला साडी वर करण्यास सांगितल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २६ नोव्हेंबर आणि १० डिसेंबर रोजी दोन वेळा घडला. याप्रकरणी येरवडा पोलीस 9Yerwada Police)  ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime) 

मुकेश सिंह पुंन्डील (Mukesh Singh Pundil) (वय ३१, रा. येरवडा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ५० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला 'हॉटेल पार्क ऑर्नेट'च्या किचनमध्ये काम करते. आरोपी मुकेशसिंह हा या हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करतो. आरोपीने या महिलेला वेळेवर कामावर येत नाही या कारणावरून त्यांना अभद्र भाषेत बडबड केली. तसेच त्यांच्यावर वाईट नजर ठेवली. त्यामुळे पिडीत महिलेने त्यांना ड्यूटी रजिस्टर तपासण्यास सांगितले. आरोपीने त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली.

त्यानंतर त्यांना 'अंडी कुठे कुठे लपवली आहेस?' असे विचारात त्यांच्या अंगाला विविध ठिकाणी अश्लील स्पर्श केले. तसेच त्यांना साडी वर करून दाखव असे म्हणत अश्लील शेरेबाजी केली. त्यांना नोकरी घालवण्याची भीती घातली. तसेच, त्यांचा रस्ता देखील अडवला. पुढील तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest