संग्रहित छायाचित्र
पुणे : नराधम पित्याने स्वतःच्या साडेचार वर्षाच्या मुलीसोबत गैरवर्तन करून तिचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदन नगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार ६ जानेवारी पूर्वी आठ ते दहा दिवसअगोदर घडला. याप्रकरणी ३४ वर्षीय वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. हे कुटुंब खराडी येथील निर्मल कॉन्व्हेंटस्कूल जवळ राहण्यास आहे. आरोपी आणि फिर्यादी पती-पत्नी आहेत. आरोपीने त्यांच्या साडेचार वर्षांच्या मुलीला जवळ घेऊन तिच्या मनात भीती लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले. तिच्याशी गैरवर्तणूक केली. तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत बलात्कार केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.