Cyber Crime: टास्क फ्रॉडमध्ये फसणारे उच्चशिक्षितच अधिक!

पुणे: टास्कच्या बहाण्याने एका उच्चशिक्षित व्यक्तीची २० लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार २८ मार्च ते ३ जानेवारी या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून

संग्रहित छायाचित्र

राजस्थानमधील टोळीकडून २०० कोटींची फसवणूक झाल्यावरही फसवणुकीचे प्रमाण काही घटेना

पुणे: टास्कच्या बहाण्याने एका उच्चशिक्षित व्यक्तीची २० लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार २८ मार्च ते ३ जानेवारी या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी राजस्थानमधील १५ जणांची टोळी पकडून देशभरातील २०० कोटींचा फसवणुकीचा प्रकार नुकताच उघड केला. उच्चशिक्षितांकडून अतिरिक्त कमाईच्या नादात फसण्याचे प्रमाण वाढत आहे. (Pune Crime News)

अविनाश क्रिश्ननकुट्टी कुन्नूबरम (वय ४०, रा. थेरगाव. मूळ रा. केरळ) यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. 

आरोपींनी कुन्नूबरम यांना सुरुवातीला व्हॉट्स ॲपवरून संपर्क केला. त्यांना  मेसेज करून एका टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन करून घेतले. त्यानंतर वेळोवेळी प्रीपेड टास्क देऊन वेगवेगळ्या बँक खात्यावर एकूण २० लाख ३२ हजार ७८७ रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना कोणताही मोबदला अथवा त्यांची रक्कम परत न करता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटल आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत. (Cyber Crime)

पिंपरी-चिंचवड शहरात हिंजवडी आयटी हबमुळे देशविदेशातील अनेकजण नोकरीसाठी स्थायिक झाले आहेत. पार्टटाईम जॉब अथवा नोकरी मिळविण्यासाठी, अतिरिक्त कमाईसाठी  अनेकजण ऑनलाईन शोध घेत असतात. विशेष म्हणजे ऑनलाईन फसवणूक होणाऱ्या १०० पैकी ९० जण हे उच्चशिक्षित असून, उरलेले निवृत्त अथवा गृहिणी असल्याचे तपासातून समोर आले आहे.

ऑनलाईन टास्क फ्रॉडच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने सुमारे तीन ते चार महिने तपास करून राजस्थानातून १५ जणांना पकडून पिंपरी-चिंचवडमध्ये आणले. तेव्हा या महाभागांनी शहरात ऑनलाईन फ्रॉड केल्याचा आकडा हा ३ कोटींहून अधिक असल्याचे उघड झाले. पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी काहीजणांचे बँक खाते गोठविण्यात आल्याने फसवणूक झालेल्यांचे पैसे परत करण्यात पोलिसांना यश आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी गंडा घातलेला पैसा परदेशातील काही सहआरोपींना पाठविल्याचे उघड झाले आहे. तसेच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पकडलेल्या आरोपींनी गेल्या काही दिवसात ५-१० नव्हे तर २०० कोटी रुपयांना गंडा घातल्याचे उघड झाल्यावर या संपूर्ण टोळीचा आंतरराष्ट्रीय कारनामा समोर आला आहे.

पोलिसांकडून ऑनलाईन आणि ऑफलाईन फसवणूक होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु, अधिकचा परतावा,  कमाईसाठी नाडलेल्यांना फसविण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest