संग्रहित छायाचित्र
पुणे: अज्ञात चोरट्याने घरातील एक लाख रुपये रोख रक्कम आणि १.९४ लाख किमतीच्या ५५.८५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला.हा प्रकार फिर्यादी यांच्या राहत्या घरी मक्का मस्जिद गेट नंबर १ जवळील खातिजा मंजिल समोर, कोंढवा खुर्द, पुणे येथे घडला. (Pune Crime News)
या प्रकरणी जावेद सलीम खान यांनी अज्ञात इसमाविरोधात कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला.
सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय सर्वजण गुजरातला गेले होते. त्यावेळी अज्ञात इसमाने घराच्या बेडरूमची खिडकी बाहेरून कशाच्या तरी सहाय्याने उघडली. खिडकीचे लोखंडी ग्रील कट केले. घरात बेकायदेशीर प्रवेश केला आणि कपाटातील एक लाख रुपये रोख रक्कम आणि १.९४ लाख किमतीच्या ५५.८५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी केले. हा प्रकार १२ जानेवारी ते १६ जानेवारी या दरम्यान घडला. पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.