संग्रहित छायाचित्र
पिंपरी चिंचवड: विक्रीसाठी घरात साठवलेला ११ लाख ४८ हजार ३४१ रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला जप्त केला. याप्रकरणी एकाला अटक केली. देहूरोड येथे मुख्य बाजारात मंगळवारी (२३ जानेवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अन्न सुरक्षा प्रशासन आणि देहूरोड पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. (pimpri chinchwad crime)
रियाज आजिज शेख (४५, रा. मेन बाजार, देहूरोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता गायकवाड यांनी याप्रकरणी बुधवारी (२४ जानेवारी) देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाज याने विक्रीसाठी प्रतिबंधित पानमसाला साठवला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अन्नसुरक्षा प्रशासन आणि देहूरोड पोलिसांनी संयुक्त कारवाई करून ११ लाख ४८ हजार ३४१ रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा (पानमसाला) साठा जप्त केला. पोलीस उपनिरीक्षक राहुल भंडारे तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.