तळेगाव दाभाडे येथे पूर्ववैमनस्यातून गोळीबार

काल रात्री (मंगळवारी) साडे अकराच्या सुमारास ची घटना घडली असून, एकजण किरकोळ जखमी झाला आहे. आदित्य भेगडे (वय २७, रा. तळेगाव दाभाडे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर १७ वर्षीय मुलाने हा गोळीबार केला आहे.

Pimpri Chinchwad Police

जखमी आदित्य भेगडे

काल रात्री (मंगळवारी) साडे अकराच्या सुमारास ची घटना घडली असून, एकजण किरकोळ जखमी झाला आहे. आदित्य भेगडे (वय २७, रा. तळेगाव दाभाडे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर १७ वर्षीय मुलाने हा गोळीबार केला आहे. (Crime News)

वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपी आणि आदित्य भेगडे हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यात पूर्वीपासून वाद आहेत. मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास भेगडे आळी तळेगाव दाभाडे येथे ते एकमेकांच्या समोरासमोर आले. एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि आरोपी याने आदित्यवर गोळीबार केला. यामध्ये आदित्य किरकोळ जखमी झाला आहे. त्यानंतर आरोपी पळून गेला. तळेगाव दाभाडे पोलीस (Talegaon Dabhade Police) तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest