Sunil Dhumal Suicide : भाजपा पदाधिकाऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या; पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ

पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे प्रदेश संपर्क प्रमुख असलेल्या सुनील धुमाळ (Sunil Dhumal) यांनी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली.

Sunil Dhumal Suicide

भाजपा पदाधिकाऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ

पुणे : पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे प्रदेश संपर्क प्रमुख असलेल्या सुनील धुमाळ (Sunil Dhumal) यांनी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी आठ वाजण्यापूर्वी हडपसर येथील साडेसतरानळी येथील रेल्वे रुळावर घडली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी (Logmarg Police)  अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे लोहमार्ग पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले. (Sunil Dhumal Suicide) 

या घटनेमुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हडपसर परिसरामधील साडेसतरा नळी परिसरात ४७ वर्षीय धुमाळ राहायला होते. त्यांचे हडपसर परिसरात सामाजिक व राजकीय काम होते. आत्महत्येच्या कारणांबाबत  कुटुंबियांकडून देखील पोलिसांना नीट माहिती मिळालेली नाही. (Pune Crime News) 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest