पुणे : आयटी इंजिनियरकडून अमेझॉनमधील महिलेवर बलात्कार; ‘टिंडर’ डेटिंग ॲप’वरील ओळखीतून घडला प्रकार

‘टिंडर’ डेटिंग अॅप’वर ओळख झालेल्या एका आयटी अभियंत्याने अमेझॉनमध्ये काम करणाऱ्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवत शहरातील विविध पंचतारांकित हॉटेल्स आणि लॉजेसमध्ये नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Rape

पुणे : आयटी इंजिनियरकडून अमेझॉनमधील महिलेवर बलात्कार; ‘टिंडर’ डेटिंग ॲप’वरील ओळखीतून घडला प्रकार

आरोपीला येरवडा पोलिसांकडून बेड्या

‘टिंडर’ डेटिंग अॅप’वर ओळख झालेल्या एका आयटी अभियंत्याने अमेझॉनमध्ये काम करणाऱ्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवत शहरातील विविध पंचतारांकित हॉटेल्स आणि लॉजेसमध्ये नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ३ डिसेंबर २०२३ ते ३० जून २०२४ या कालावधीत कल्याणीनगर, विमाननगर भागात घडला. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात भादवि ३७६, ३७६ (१), ३७६ (२) एन, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ८ जुलैपर्यन्त चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

 नीलेशभाई पंजाभाई कलसरीया (वय ३०, रा. कोणार्क कॅम्पस, विमाननगर) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३५ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. पिडीत महिला वानवडी परिसरात राहण्यास आहे. तर, आरोपी हा मूळचा गुजरातच्या अमदाबादमधील रहिवासी आहे. मागील एक वर्षांपासून तो पुण्यातील एका बड्या आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो. तर, पीडित महिला अमेझॉनमध्ये वरिष्ठ पदावर नेमणुकीस असून ती सध्या घराधूनच काम (वर्क फ्रॉम होम) करते. या महिलेचे आधी लग्न झालेले होते. तिचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झालेला आहे. तिला एक मुलगा देखील आहे. तिने ‘टिंडर डेटिंग अॅप’ वर अकाऊंट उघडलेले होते. याच ‘डेटिंग अॅप’ वर आरोपीने देखील अकाऊंट उघडलेले होते. या अॅपद्वारे त्याने फिर्यादी महिलेशी संपर्क साधला. तिला मैत्रीसाठी त्याने विचारणा केली. 

या दोघांमध्ये ओळख झाली. त्यानंतर, त्यांचे भेटणे सुरू झाले. एकमेकांशी वारंवार बोलणे सुरू झाले. यातूनच त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले. आरोपीने या महिलेला वेळोवेळी विविध हॉटेल्स भेटायला बोलावले. तिच्या इच्छेविरुद्ध त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपीने या महिलेला ३ डिसेंबर २०२३ ते ३० जून २०२४ या कालावधीत कल्याणीनगर भागातील हॉटेल रॉयल ओर्कीड, गोल्डन सुट्स, हयात हॉटेल, मॅग्नस रिव्हरसाईड हॉटेलमध्ये तसेच विमाननगर भागातील हॉटेल आणि लॉजेसमध्ये नेऊन तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. यासोबतच त्याच्या स्वत:च्या राहत्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच त्याने त्याच्यासोबत ‘रिलेशनशिप’ सुरू ठेवली नाही तर तिला आणि तिच्या मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. पोलिसांकडे यासंदर्भात पिडीत महिलेकडून तक्रार दाखल होताच आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखेडे करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest