अबब ! पुण्यात झाली चक्क फ्लॅटची चोरी
पुणे: सणस बिल्डर्सकडून (Sanas Builders) बांधण्यात येणाऱ्या लुल्लानगर (Lullanagar) येथील बेव्हरली हिल्स या गृहप्रकल्पापाचे कुलमुख्यातरधारक विठ्ठल नारायण भोरे यांच्या नावाने दोन सदनिका खरेदीसाठी अनोळखी आरोपीसह नितीन पाटणकर यांनी बनावट करारनामा केला. दस्त करून देणाऱ्या व्यक्तीस ओळखताे म्हणून आरोपी मिलिंद गोसावी, प्राची पाटणकर, विवेक शुक्ला यांनी स्वाक्षरी केल्याचे सणस यांनी फिर्यादीत म्हटले आहे. (Pune Crime News)
सदनिका खरेदी व्यवहारात बनावट कर्ज प्रकरण तसेच दस्त नोंदणी करून बांधकाम व्यावसायिकाची साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ (Bharti Vidyapith Police) पोलिसांनी बँक अधिकारी, दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी एका अनाेळखी व्यक्तीसह नितीन राजाराम पाटणकर (वय ३५, रा. हातकणंगले, इचलकरंजी, जि. कोल्हापूर), पुरुषोत्तम गजानन पाटणकर (वय ३८, रा. चिंचवड), मिलिंद गोसावी (वय ५०, रा. कात्रज), प्राची पाटणकर (रा. कोल्हापूर), विवेक शाम शुक्ला (रा. बिबवेवाडी), हवेली दुय्यम निबंध कार्यालयातील निबंधक, डीबीएस बँकेतील अधिकारी, कर्मचारी, बँक ऑफ महाराष्ट्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बांधकाम व्यावसायिक सुभाष बाबूराव सणस (वय ६७, रा. सणस रेसीडन्सी, नाॅर्थ मेन रस्ता, कोरेगाव पार्क) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.