संग्रहित छायाचित्र
पिंपरी चिंचवड: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून ते शेअर विकत युवकाची तब्बल २६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक १८ नोव्हेंबर २०२३ ते १६ जानेवारी २०२४ या कालावधीत पुनावळे येथे ऑनलाईन पद्धतीने घडली. (pimpri chinchwad news)
याप्रकरणी आशिष श्यामसुंदर कुलकर्णी (वय ३९, रा.पुनावळे) यांनी रावेत पोलीस ठाण्यात (Ravet Police) फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी अनिल शर्मा, आशिष शहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलकर्णी यांना फ्रन्टलाईन के-०४ या व्हॉटसअॅप ग्रुपवर कुलकर्णी यांना शेअर मार्केटची माहिती पाठवून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना परताव्याचे आमिष दाखविण्यात आले. आरोपींनी CHC-SFS या अॅपवरून २६ लाख १२ हजार रुपयांचे शेअर खऱेदी करायला लावले. पुढे त्यांनी ते शेअर विकून कुलकर्णी यांना ती रक्कम न देता परस्पर स्वतःच्या खात्यावर घेत कुलकर्णी यांची २६ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केली. यावरून रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.