पुणे : भरधाव कारने पादचारी महिलेला उडवले

भरधाव कारने उडवल्याने पादचारी महिला गंभीर जखमी झाली. ही घटना २३ मे रोजी हिंजवडी परिसरात घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Pune Accident

पुणे : भरधाव कारने पादचारी महिलेला उडवले

भरधाव कारने उडवल्याने पादचारी महिला गंभीर जखमी झाली. ही घटना २३ मे रोजी हिंजवडी परिसरात घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Pune Accident)

हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ मे २०२४ रोजी महिला रस्त्याने पायी जात होत्या. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांना पाठीमागून धडक दिली. त्यानंतर चालकाचा ताबा सुटलेली कार एका दुकानात घुसली. 
दरम्यान, अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. पोलिसांनी संबंधित महिलेच्या नातेवाईकांना संपर्क केला. मात्र, आपली कोणतीही तक्रार नसल्याचे नातेवाइकांकडून सांगण्यात आले. तसेच, संबंधित महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे. 

पुण्यातील पोर्शे अपघाताची चर्चा 
संबंधित अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर समाज माध्यमांवर पुण्यातील पोर्शे अपघाताची चर्चा सुरू झाली. पोलिसांनी दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात आले. मात्र, संबंधित महिला आणि तिच्या नातेवाईकांनी तक्रार दिली नसल्याने गुन्हा नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

गुन्हा दाखल होण्याची शक्यता
अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या प्रकरणात मोटार वाहन कायदा २७९ नुसार गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest