संग्रहित छायाचित्र
विरुद्ध दिशेने येत ट्रकला धडक दिली व नंतर ट्रक चालकालाच लाथाबुकक्यांनी मारहाण केली आहे. ही घटना मंगळवारी (३ एप्रिल) चाकण येथे तळेगाव चौक येथे घडली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी एकाला अटक केली आहे. (Pimpri Chinchwad Crime)
संकेत रामदास जाधव (वय २७ रा.वाकी, खेड) असे अटक आरोपीचे नाव असून त्याचे साथीदार सचिन वखरे व दोन अनोळखी इसमावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शिव बगेल मोतीलाल बगेल (वय ४० रा.मध्यप्रदेश) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा ट्रक घेवून जात होते यावेळी आरोपी दुचाकीवरून विरुद्ध दिशेने येत होते. त्यांनी उजव्या बाजुने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता ते फिर्यादीच्या ट्रकला धडकले. यावेळी त्यांनी फिर्यादीलाच लाथाबुक्क्यांनी व लाकडी बांबूने मारहाण केली. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यावरून चाकण पोलिसांनी एकाला अटक केली करण्यात आली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.