Kondhwa Police : मोठा शस्त्रसाठा जप्त; सात पिस्तुले आणि २४ काडतुसे केले जप्त : कोंढवा पोलिसांची कारवाई

कोंढवा पोलिसांच्या (Kondhwa Police) तपास पथकाने तीन सराईत गुन्हेगारांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्र जप्त केली असून सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून ३ लाख ५० हजार रुपयांची सात पिस्तुले आणि २४ जीवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याची माहिती परीमंडळ पाचचे उपायुक्त आर. राजा यांनी दिली. (Pune Crime)

Kondhwa police

मोठा शस्त्रसाठा जप्त; सात पिस्तुले आणि २४ काडतुसे केले जप्त : कोंढवा पोलिसांची कारवाई

पुणे : कोंढवा पोलिसांच्या (Kondhwa Police) तपास पथकाने तीन सराईत गुन्हेगारांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्र जप्त केली असून सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून ३ लाख ५० हजार रुपयांची सात पिस्तुले आणि २४ जीवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याची माहिती परीमंडळ पाचचे उपायुक्त आर. राजा यांनी दिली. (Pune Crime) 

संदेश उर्फ संजय अंकुश जाधव (Sandesh Jadhav)  (वय ३२, रा. गोकुळ हौसींग सोसायटी,  चिखली), शिवाजी उर्फ शिवा भाऊ कुडेकर  (Shivaji Kudekar) (वय ३४, रा. वाशेरे, ता. खेड), राहुल नानसिंग लिंगवाले (Rahul Lingavale) (रा. मध्यप्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत. जाधव याच्यावर चिखली, देहुरोड, वडगाव मावळ, निगडी, भोसरी पोलीस ठाणे येथे दरोडयाचा प्रयत्न, घरफोडी, वाहन चोरी, तसेच बेकायदेशीर अग्नीशस्त्र जवळ बाळल्याबाबत एकुण ३२ गुन्हे दाखल आहेत. तर, कुडेकर याच्यावर खेड पोलीस ठाणे येथे खुन, जबरी चोरी, व सरकारी कामात अडथळा केल्याबाबत एकुण ३ गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरुध्द बेकायदेशीर अग्नीशस्त्र जवळ बाळगल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी बेकाशयदेशीरपणे अग्नीशस्त्र जवळ बाळगणाऱ्या व्यक्तींचा शोध घेत होते.  तपास पथक अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील आणि त्यांचे कर्मचारी कोबिंग ऑपरेशन करीत होते.

 याच दरम्यान, पोलीस अंमलदार विशाल मेमाणे यांना खबऱ्यामार्फत आरोपींबाबत माहिती मिळाली. हे आरोपी बोपदेव घाटाच्या पायथ्याला गारवा हॉटेल जवळ काही दिवसापासुन येत असुन ते गुन्हेगार आहेत. त्यांच्या कंबरेला पिस्तूल असल्याची माहिती  मिळाली होती. दरम्यान हे सर्व जन १४ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास पुन्हा बोपदेव घाटात गारवा हॉटेलच्या जवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसातर, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली. वेषातंर केलेले पोलीस ठिकठिकाणी थांबले. त्यावेळी लाल रंगाचा शर्ट घातलेला केस वाढविलेला व त्याच्या सोबत असणारा ग्रे रंगाचा टि शर्ट घातलेला अशा दोन व्यक्ती संध्याकाळी सातच्या सुमारास शेयर रिक्षामधून खाली उतरल्या. हे दोघेही गारवा हॉटेलच्या दिशेन जात असतानाच पोलीस त्यांना पकडण्यासाठी सरसावले. पोलिसांची कुणकुण लागताच हे दोघेही अंधारात डोंगराच्या दिशेने पळाले. पोलिसांनी पाठलाग करीत त्यांना थोडयाच अंतरावर पकडले. त्यांची झडती घेतली असता दोघांच्या कंबरेला प्रत्येकी एक पिस्तूल आढळून आले. जाधवच्या पॅन्टच्या खिशात ३ व कुडेकरच्या खिशात २ जिंवत काडतुसे मिळाली.  

त्यांच्याकडे अधिक तपास करायला सुरुवात करण्यात आली. ही अग्नीशस्त्र कोणाकडुन खरेदी केली याबाबत तपास सुरू करण्यात आला. दरम्यान, कुडेकर याच्या घरझडतीत आणखीन ३ अग्नीशस्त्र व ९ जिवंत काडतुसे मिळुन आली. आरोपींनी ही शस्त्र महाराष्ट्र-मध्यप्रदेश सिमेवर असलेल्या बडवाणी जिल्ह्यातील उमरटी गावामधून आणल्याचे सांगितले. या गावातील ओंकार बर्नाला याच्याकडून ही शस्त्र त्यांनी खरेदी केली होती.  त्याअनुषंगाने पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी एक पथक ओंकार बर्नाला याला अटक करण्यासाठी रवाना केले. त्याला अटक करण्याकरिता रणनीती आखण्यात आली. जाधव आणि कुडेकर यांच्या मार्फत त्याच्याशी संपर्क साधण्यात आला. आणखीन दोन अग्नीशस्त्र व १० जिवंत काडतुस आवश्यक असल्याचे त्याला सांगण्यात आले. तेव्हा त्याने ही शस्त्रे जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे असलेल्या सुर्या हॉटेल जवळ देतो असे सांगितले. त्यानुसार पोलीस स्थानिक रहिवाशांप्रमाणे पेहेराव करुन तेथे गेले. याठिकाणी ओंकार बर्नाला हा त्याचा हस्तक राहुल नानसिंग लिंगवाले याच्यासह आला. लिंगवाले याच्याकडे दोन अग्नीशस्त्र व १० जिवंत काडतुसे त्याने पाठवुन दिली. पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. दरम्यान बर्नाला मोटार सायकलवरुन पसार झाला. त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

ही कारवाई उपायुक्त आर. राजा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप भोसले, संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, लेखाजी शिंदे, पोलीस हवालदार विशाल मेमाणे, सतिश चव्हाण, निलेश देसाई, लवेश शिंदे, शाहीद शेख, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे, सुजित मदन, ज्ञानेश्वर भोसले, सुरज शुक्ला यांच्या पथकाने केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest