एमएनजीएलचे पेमेंट अपडेट करण्याच्या बहाण्याने ८९ हजारांची फसवणूक
एमएनजीएलचे पेमेंट अपडेट करण्याच्या बहाण्याने वृद्ध व्यक्तीला एक एप डाउनलोड करण्यास सांगितले. त्या नंतर वृद्ध व्यक्तीकडून ओटीपी घेऊन गुगल पे द्वारे ८९ हजार ६८ रुपये ट्रान्सफर करून फसवणूक (Fraud) केली. ही घटना मंगळवारी (२ एप्रिल) दुपारी पार्क स्ट्रीट वाकड येथे घडली.
जयंत कानगुडे (Jayant Kangude)(वय ७७, रा. वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार Sahid afridi 90506719**@paytm या पेटीएम बँक खाते धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कानगुडे यांना आरोपीने फोन केला. कानगुडे यांचे एमएनजीएलचे पेमेंट अपडेट होत नाही. ते अपडेट करण्यासाठी प्रोसेस सांगतो, असे आरोपीने सांगितले. त्यानंतर कानगुडे यांना एक एप डाउनलोड करण्यास सांगितले. ट्रायल पेमेंट म्हणून १०० रुपये पाठवण्यास सांगितले. त्यानंतर ओटीपी घेऊन त्याआधारे कानगुडे यांच्या बँक खात्यातून ८९ हजार ६८ रुपये ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.