Pimpri Chinchwad Crime : नसलेल्या सदनिकेचे दस्त करून २० लाखांची फसवणूक

इमारतीमध्ये नसलेल्या सदनिकेचे दस्त करून दांपत्याकडून १९ लाख ९७ हजार रुपये घेत फसवणूक केली. ही घटना ३१ मे २०१६ ते ३ एप्रिल २०२४ या कालावधीत दुय्यम निबंधक कार्यालय, मुळशी दोन, हिंजवडी येथे घडली.

Pimpri Chinchwad Crime

संग्रहित छायाचित्र

इमारतीमध्ये नसलेल्या सदनिकेचे दस्त करून दांपत्याकडून १९ लाख ९७ हजार रुपये घेत फसवणूक केली. ही घटना ३१ मे २०१६ ते ३ एप्रिल २०२४ या कालावधीत दुय्यम निबंधक कार्यालय, मुळशी दोन, हिंजवडी येथे घडली. (Pimpri Chinchwad Crime) 

शशिकांत बबन भिलारे (रा. भूगाव रोड, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांच्या पतीचा भिलारे याने विश्वास संपादन केला. त्यांना हिरा गार्डनच्या पाठीमागे हर्षवर्धन अपार्टमेंट मध्ये १०१ ही सदनिका विक्री करण्याबाबत भिलारे याने व्यवहार केला. त्यापोटी फिर्यादीकडून रोख आणि चेक द्वारे फिर्यादी यांनी १९ लाख ९७ हजार ७१२ रुपये दिले. त्यानंतर त्या इमारतीमध्ये १०५ नंबरची सदनिका नसताना भिलारे याने त्याचा ड्राफ्ट तयार करून बनावट दस्त तयार करत फिर्यादीची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Share this story

Latest