Pune Crime News : टेलिग्राम टास्कद्वारे १६ लाखांचा गंडा

व्हाट्सअप आणि टेलिग्रामवर संपर्क साधत प्रीपेड पार्ट टाइम जॉब देण्याच्या आमिषाने १६ लाख ५० हजार ८९४ रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस (Vishrantwadi Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News

टेलिग्राम टास्कद्वारे १६ लाखांचा गंडा

पुणे : व्हाट्सअप आणि टेलिग्रामवर संपर्क साधत प्रीपेड पार्ट टाइम जॉब देण्याच्या आमिषाने १६ लाख ५० हजार ८९४ रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस (Vishrantwadi Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर २०२३ या कालावधी दरम्यान ऑनलाईन घडला. (Pune Crime News) 

अंजनकुमार (वय ४८, रा. श्रेयस श्री बुड्स सोसायटी, धानोरी) यांनी फिर्यादी दिली आहे. अज्ञात मोबाईल आणि टेलिग्राम धारक आरोपींनी अंजन कुमार यांच्याशी संपर्क साधला. त्यांना व्हाट्सअप आणि टेलिग्राम वरून संदेश पाठविण्यात आले. प्रीपेड पार्ट टाइम जॉब देण्याचे अमिष त्यांना दाखवण्यात आले. या कामासाठी त्यांना वेगवेगळे टास्क देण्यात आले. काम पूर्ण केल्यानंतर त्यांना सुरुवातीला थोडा मोबदला देण्यात आला. मात्र त्यानंतर मोबदला पाहिजे असल्यास थोडे पैसे भरायला भाग पाडले. त्यानंतर ही कंपनी बदलल्याचे सांगूत वेगळ्या अकाउंटवर पैसे भरायला लावले. असे करत त्यांच्याकडून वेळोवेळी वेगवेगळ्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करायला लावत त्यांना कोणत्याही प्रकारचा परतावा न देता फसवणूक करण्यात आली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest