बँक मॅनेजर असल्याचे सांगून तरुणाची कर्ज  देण्याच्या बहाण्याने एक लाखाची फसवणूक

लोन डिसबसच्या बहाण्याने तरुणाची एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.ही घटना २९ मार्च रोजी चर्होली येथे घडली आहे, याप्रकरणी जालिंदर माणिक गावडे (वय ३३ रा.चऱ्होली) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बँक मॅनेजर असल्याचे सांगून तरुणाची कर्ज  देण्याच्या बहाण्याने एक लाखाची फसवणूक

लोन डिसबसच्या बहाण्याने तरुणाची एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.ही घटना २९ मार्च  रोजी चर्होली येथे घडली आहे, याप्रकरणी जालिंदर माणिक गावडे (वय ३३ रा.चऱ्होली) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून मोबाईल क्रमांक धारकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना बजाज फायनान्सचे लोन डिसबस करून देतो सांगून आरोपीने तो बँक मॅनेजर असल्याचे सांगितले. या कर्जासाठी प्रोसेस फीस १० हजार व सिक्युरीटी म्हणून १ लाख रुपये घेत ती रक्क्म स्वतःच्या खात्यात घेत फिर्यादीची फसवणूक केली. यावरून आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this story

Latest